आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:"सामाजिक उपक्रमातून गणेश मंडळांनी आदर्श निर्माण करावा'

आष्टी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक उपक्रमातून गणेश मंडळांनी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी केले.परतूर तालुक्यातील आष्टी येथील पोलिस ठाण्यात गणेशोत्सव निमित्ताने आयोजित शांतता समिती बैठकीत ते बोलत होते. या वेळी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, परतूर पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात, मधुकर खरात, आनंदा आगलावे, मधुकर मोर, श्रीरंग गांजाळे, बळीराम थोरात, पोलिस पाटील बबन डोळस यांच्यासह विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे निर्बंध असल्याने सण महोत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र या वर्षी सर्व सण, महोत्सव उत्साहात साजरे केले जात आहेत. गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरे, शालेय साहित्य वाटप, गरजूंना मदत, प्लास्टिकचा वापर टाळणे, मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा, कृत्रिम पाण्याचे हौद तयार करून मुर्ती विसर्जन करावे, असे आदी सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरे करावेत, असे आवाहन केले. तसेच गणेश उत्सवाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळाना प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच ग्रामीण भागातही प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक पोलिसांच्यावतीने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...