आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:मंगरूळला गंगा दशहरा उत्सव गोदावरी नदीची महाआरती; नितीन कुलकर्णी यांनी सांगितले गंगा दशहरा उत्सवाचे महत्त्व

तीर्थपुरी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या गंगा दशहरा उत्सव सुरु असून घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथे गोदावरी नदीच्या काठावर गंगा दशहरा उत्सव सोहळानिमित्त भाविकांनी आरती केली. यावेळी नदीची विधिवत पूजा करुन खणा नारळाने ओटी भरण्यात आली.

यावेळी नितीनदेवा कुलकर्णी, कृष्णा महाराज रामदासी यांच्यासह चत्रभुज खरात, पाडुरंग खरात, संदिपान देशमुख, विलास शिंदे, मदन मोटे, रूख्मिनी खरात, अर्चना खरात, शोभा शिंदे, अनुसया बेवले, सुखशैला बेवले, नंदाबाई खरात, विजया जोशी, कनाद खरात, प्रसाद खरात, पार्थ खरात, वरद, कृष्णा, गौरव राखुंडे, माउली बेवले, यश राखुंडे, रोहित पावटेकर आदी उपस्थित होते. यावेळी भाविकांनी नदीपात्रात जाऊन गंगेला साडी चोळी अर्पण करीत दीपदान केले. नितीन कुलकर्णी यांनी सांगितले की, नदीला देवदेवतांचा दर्जा दिला आहे. प्रत्येक प्राणिमात्रांचे व वनस्पतीचे अस्तित्वच पाण्यामुळे आहे. हे मानवाने विसरू नये पाणी प्रदूषित होणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणून जलपूजन हा संस्कार अशा उपक्रमातून भारतीयावर रुजविल्या जातो. असे सांगून गंगा दशहरा उत्सवाचे महत्त्व सांगितले. पाण्याचे स्त्रोत जपून प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...