आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:टेंभुर्णीत शालेय वर्गमित्र-मैत्रिणींचा मेळावा

टेंभुर्णी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नवभारत हायस्कूलमध्ये १९९० मध्ये शिकणारे दहावीचे शालेय मित्र-मैत्रिणी ३२ वर्षांनंतर एकत्रित आले. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत गुरुवारी मित्र-मैत्रिणींचा मेळा येथील काबरा कृषी फार्मला रंगला.

यावेळी जगन वाघमोडे यांनी अनंत राऊत यांची मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता सादर करून मने जिंकले. तर किसन वांद्रे या उद्योजक मित्राने मनोगत व्यक्त करताना बालपणीच्या आठवणी जागविल्या. या मेळाव्यात ७० वर्गमित्र सहभागी झाले होते. जुन्या आठवणींसोबत विद्यमान परिस्थिती कशी आहे याची जाणीव ठेवत एकमेकांना सहकार्य करण्याचे यावेळी ठरले.

यावेळी अशोक जाधव, माणिक मस्के, धीरज काबरा, सर्जेराव कुमकर, संजय डोईफोडे, किशोर गायकवाड, संजय मुळे, गजानन अंधारे, अशोक राऊत, शंकर धनवई, विजय उबरहडे, गंगाकिसन उखर्डे, प्रदीप धनवे, अजय उंबरहडे, माया मुळे, वर्षा निकम, मंगल शर्मा, कांता तांबेकर, गोदावरी खलसे, लता उदावंत, बाबासाहेब डोमळे, कृष्णा जाधव, रमेश भाले, रमेश मांटे, राजू कुमावत, रामदास शेळके आदी वर्गमित्र सहभागी झाले होते. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांसोबत स्नेह मिलनाच्या निमित्ताने एकत्रित येण्याचा योग आला. यामुळे पुन्हा एकदा शालेय आठवणींना उजाळा मिळाला.

बालपणीचा काळ सुखाचा याचा प्रत्यय पुन्हा एकदा मिळाल्याने मनामध्ये आनंदाला उधाण आल.े या कार्यक्रमातून जुन्या सवंगड्याचे आजच्या काळातील महत्त्व कळाले अनेक जण उच्च पदावर असूनही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले यामुळे अशा कार्यक्रमाचे नियमित आयोजन केले जावे, असे सर्जेराव कुमकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...