आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्वापर:वेस्ट टू बेस्ट प्लास्टिकपासून गट्टू निर्मिती; ग्रीन आर्मी सृष्टी फाउंडेशनचा पुढाकार, जालन्यात प्लास्टिक संकलन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टिक कचरा पर्यावरण संवर्धनात मोठी समस्या बनू पाहात आहे. जगातील अनेक पर्यावरण प्रेमी कचरा प्लास्टिक विषयी चिंता व्यक्त करत आहेत. प्लास्टिकचा योग्य पुनर्वापर हा त्यावर उत्तम उपाय असू शकतो आणि यावरच ग्रीन आर्मी सृष्टी फाऊंडेशनचे काम चालू आहे. जानेवारीपासून विविध विभागातील प्लास्टिक संकलनाचे काम सुरू आहे.

जालन्यातील विविध हॉटेलमधील एक लिटर पिण्याच्या पाण्याच्या बॉटल संकलन करून त्यापासून प्लास्टिक गट्टू बनवण्याचे काम ग्रीन आर्मी करत आहे.ग्रीन आर्मी सृष्टी फाउंडेशन मध्ये पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद यासोबतच जालन्यातील शंभर विविध पर्यावरणप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभत आहे. प्लास्टिक गट्टू तयार करून ते मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरात विविध ठिकाणी खुर्ची बेंचेस तयार करण्यासाठी याचा वापर होत आहे.

यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळत आहे. प्लास्टिक कचरा व प्लास्टिक पाण्याची बॉटल यांचा यामुळे योग्य पुनर्वापर होत असल्याचे मत ग्रीन आर्मी च्या समन्वयक डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी व्यक्त केले. या कामासाठी कालिका स्टील कंपनीकडून आर्थिक मदत होत आहे. सर्व कामासाठी सृष्टी फाऊंडेशनच्या तारा काबरा, संध्या जहागीरदार, शैला पोपळघट, विद्या पाटील, जयश्री कुणके, संगीता मुळे, मंजू क्षीरसागर, शारदा आहेरकर, राजश्री मुर्गे यांचे सहकार्य लाभत असल्याचे डॉ. श्रीपत म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...