आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंचमान्यता २०२२-२३ साठी १ डिसेंबर रोजी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरली जाणार आहे. माहिती फॉरवर्ड करण्यासाठी शाळांना ६ जानेवारीची डेडलाईन देण्यात आली आहे. संचमान्यता म्हणजे एका प्रकारे शाळांची कुंडली ठरत आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन केल्याने नियोजन सोईस्कर झालेले आहे. दरवर्षी ही संचमान्यता अपडेट करावी लागते. यावर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
यामध्ये संच मान्यतेसाठी ३० नोव्हेंबर रोजीची पटसंख्या विचारात घेण्यात येणार आहे. संच मान्यता पासवर्डची काही अडचण असेल तर केंद्रप्रमुख यांच्या स्कूल पोर्टलवरून पासवर्ड रीसेट करता येईल. संच मान्यता ही सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी फॉरवर्ड करणे बंधनकारक आहे. एकदा फॉरवर्ड केलेली संच मान्यता कोणत्याही लॉगीनवरून रिटर्न करण्याची सुविधा उपलब्ध नाही म्हणून संच मान्यतेची माहिती काळजीपूर्वक भरावी. संच मान्यता फॉरवर्ड करण्याचा अंतिम दिनांक ६ जानेवारी ठेवण्यात आला आहे.
संच मान्यता फॉरवर्ड न केल्यास पदनिश्चितीला अडचण जालना ग्रामीण भागातील शाळांनी तांत्रिक अडचण अथवा पासवर्ड रीसेट साठी आपल्या केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा. दिलेल्या मुदतीत संच मान्यता फॉरवर्ड करण्याची सर्वस्वी जबाबदारी शालेय मुख्याध्यापकांची राहील. संच मान्यता फॉरवर्ड न केल्याने त्या शाळेची पदनिश्चिती होणार नाही याची नोंद घ्यावी, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी सांगीतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.