आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाधिकाऱ्यांची निवड:मराठा महासंघाची 20 नोव्हेंबरला पंढरपुरात सर्वसाधारण सभा

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ. भा. मराठा संघाची सर्वसाधारण सभा येत्या रविवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती मंठा तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी दिली. तनपुरे महाराज मठ लक्ष्मी रस्ता पंढरपूर या ठिकाणी होणार असून या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त सभासदांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राजेंद्र कोंढरे यांनी केले आहे. महासंघाच्या या सभेत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन, महामंडळाच्या योजना, उद्योजक घडविणे इ विषयावर चर्चा होणार आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा येथे बैठकीत संभाजी काकडे, कैलास सरकटे, मुकुंद गोटे, राहुल देशमुख, प्रवेश येवले, पवन रेंगे, उमेश सरकटे, गजानन खंदारे, ज्ञानेश्वर देशमुख, शिवप्रसाद शिंदे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...