आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:रस्त्याचे काम मार्गी लावा, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

सिंधी काळेगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील रामनगर येथून मानेगाव, पाथ्रूडमार्गे शेवली या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, नसता १६ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा रामनगर, मानेगाव, पाथ्रूड, सेवली संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.

रामनगर ते मानेगाव - सावंगी फाटा - पाथ्रूड ते सेवली रस्त्यांची अत्यंत दुर्देवी अवस्था झालेली आहे. तसेच गेल्या काही महिन्यात अनेक शेतकरी कष्टकरी मजुर ये-जा करत असताना त्यांना आपला जिव गमवावा लागला आहे. तसेच या रस्त्यावर बऱ्याच गर्भवती महिलांच्या रस्त्या अभावी रस्त्यातच प्रसूती झाल्या आहे. हा रस्ता कमीत कमी ४० ते ५० गाव तसेच मराठवाडा व विदर्भास जोडणारा रस्ता आहे.

सतत या रस्त्यावर मोठा प्रमाणावर वाहतूक होते व या रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था झालेली आहे. यापुढेही अनेक लोकांचे अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सततच्या अतिवृष्टी व नापिकी मुळे सर्व ग्रामीण भागातील शेतकरी परेशान आसतांनी त्यात अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवाव लागत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी केली आहे. नसता येणाऱ्या १५ नोव्हेंबर पर्यंत रस्त्याचे काम चालू न झाल्यास १६ पासून परिसरातील सर्व शेतकरी मजूर व सर्व नागरिक यांच्याकडून बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल, असा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...