आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:कामगारांना कामावर रुजू करा : मनसेचे आंदोलन

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषद कार्यालय येथे मागील १५ ते २० वर्षांपासून काम करणाऱ्या सफाई कामगारांना कोणतेही कारण न देता कामावरून काढण्यात आले आहे. या कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे, तसेच शहरातील काही रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत व झालेले बोगस कामांबाबत या मागणीसाठी मनसेच्या वतीने नगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनास्थळी मनेसेचे जिल्हाध्यक्ष रवि राऊत, राहुल रत्नपारखे, वंदना खांडेभराड, गोरखअप्पा पंगुडवाले, शरद मांगधरे, रेखा गंगातिवरे, महेश नागवे, आर. आर. पाटोळे, सतीश खांडेभराड, विलास तिकांडे अर्जून कणसे, गजानन लाखोले, संजय राजगुरे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...