आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:घनसावंगी पोलिसांची‎ कारवाई, टेम्पोसह‎ एक जण ताब्यात‎

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ घनसावंगी तालुक्यातील कुंभार‎ पिंपळगाव येथील बाजारातून‎ कत्तलीसाठी जाणाऱ्या ११‎ जनावरांची सुटका घनसावंगी‎ पोलिसांनी बुधवारी केली. पोलिसांनी‎ टेम्पोसह चालकाला ताब्यात घेतले‎ आहे. अजिम अब्दुल शेख असे‎ संशयित आरोपीचे नाव आहे.‎ बुधवारी कुंभार पिंपळगाव येथील‎ बाजारातून एका टेम्पोमध्ये जनावरे‎ कत्तलीसाठी जात असल्याचा संशय‎ राहुल वरतले यांना आला.

त्यांनी‎ याची माहिती पोलिसांना दिली.‎ पोउपनि मरळ हे कर्मचाऱ्यांसह‎ पोहेचले. त्यांनी टेम्पो (एमएच ०४‎ बीजी ८७६०) याला ताब्यातून‎ विचारपूस केली. या वेळी चालकाने‎ उडवाउडवीची उत्तरे दिली.‎ पोलिसांनी कत्तलीसाठी जाणारी ११‎ जनावरे पंचांसमक्ष ताब्यात घेतली.‎ शिवाय चालक अजीम अब्दुल शेख‎ यास ताब्यात घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...