आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन’ घनसावंगी “महादंबानगरी’ येथे १० व ११ डिसेंबर रोजी होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक शेषराव मोहिते यांची उपस्थिती राहणार आहे.
शनिवारी सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीला सुरुवात हाेईल. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. साडेदहा वाजता मुख्य उद्घाटन सोहळा चालेल. त्यानंतर दुपारी दीड ते अडीच प्राचार्य नागनाथ पाटील वसमतनगर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन, त्याच वेळी दुसऱ्या सभागृहात छाया महाजन यांच्या अध्यक्षतेखाली “नवलेखांचे लेखन समाज माध्यमांच्या आवर्तात अडकले आहे!’ या विषयावर परिसंवाद. तिसऱ्या सभागृहात जगदीश कदम नांदेड, यांच्या अध्यक्षतेखाली “मी का लिहितो/लिहिते’ याविषयी परिसंवाद. सायंकाळी पावणे पाच ते सात वाजेदरम्यान फ.म. शाहजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली “कृषी जीवनातील प्रक्षोभ आणि मराठी लेखक’ या विषयावर परिसंवाद. याच वेळी बा.भो. शास्त्री-करमाड यांच्या अध्यक्षतेखाली “संत साहित्याची उपेक्षा समाज चारित्र्यासाठी हानिकारक आहे!’ हा परिसंवाद होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.