आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:कोठी ग्रामपंचायतअंतर्गत घरकुल घोटाळा; तहासीलदारांनी दिले चौकशीचे आदेश

तीर्थपुरी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील कोठी येथे घरकूल घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी तातेराव पांढरे यांनी केली आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व संबंधितांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कोठी ग्रामपंचायत अंतर्गत अनेक लाभार्थ्यांच्या नावावर घरकूल मंजूर झालेली आहेत.

मात्र, ज्यांच्या नावावर घरकुल मंजूर झाले आहे त्यांच्या यादीतील अनुक्रमांकावर असलेल्या नावाची खाडाखोड करून त्याठिकाणी दुसऱ्याचे नाव टाकण्याचा प्रकार ग्रामपंचायतच्या संबंधितांनी केल्याचा आरोप तात्याराव पांढरे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. पांढरे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने घनसावंगीचे तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती घनसावंगी यांना पत्र देऊन याविषयी योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...