आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल योजना:घरकुल योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू

तीर्थपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी नगर पंचायतच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजनेसाठी स्थानिक नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. जवळपास १४०० च्या जवळपास अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती असून त्यासाठी संबंधित संस्थेने प्रति अर्जासाठी ७०० रुपये नागरिकांकडून घेतले आहेत. आलेले अर्ज स्वीकारून त्याचे सर्वेक्षण करून पुढील सर्व प्रक्रियेसाठी नगरपंचायतने औरंगाबाद येथील अस्मी ग्रुप या संस्थेसोबत करार केला आहे.

अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू झालेले असून आतापर्यंत जवळपास एक हजार अर्जाचे सर्वेक्षण पूर्ण झालेले असून चारशेच्या जवळपास अर्जाच्या सर्वेक्षणाचे काम अद्याप बाकी असल्याची माहिती सर्वेक्षण करणाऱ्या अस्मि ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान सर्वेक्षणाचे काम संपल्यावर पुढील तांत्रिक काम पूर्ण होऊन पंतप्रधान घरकुल योजने मधून आपले घराचे स्वप्न कधी पूर्ण होईल याची चिंता नागरिकांना लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...