आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक करणारी नववधू:पहिल्या दिवशी भेट, दुसऱ्या दिवशी लग्न, तिसऱ्या रात्री नववधू दागिने घेऊन पसार, शेतकरी कुटुंबाला 3 लाखांना लुबाडले

पिंपळगाव रेणुकाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फसवणूक करणारी हीच ती नववधू. - Divya Marathi
फसवणूक करणारी हीच ती नववधू.

भोकरदन तालुक्यातील पारध पोलिस स्टेशन हद्दीमध्ये शेलूद येथील शेतकरी परिवारामध्ये हिंगोली जिल्ह्यातील नववधूसोबत दोन दिवसांपूर्वी एका मंदिरात लग्न लावले होते. तीच नववधू रात्रीच्या वेळी रोख रक्कम व अंगावरील दागदागिने असा अंदाजे तीन लाख रुपयांचा गंडा शेलूद येथील काकडे परिवाराला घालून फरार झाली आहे.

याप्रकरणी पारध पोलिस स्टेशनमध्ये नववधूसह पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी अद्यापही फरार आहेत. भोळ्याभाबड्या शेतकरी परिवारांना या टोळ्या लग्नाचे आमिष दाखवून नवरी पाहून देतो म्हणत लग्न लावून देतात व फसवतात. तुकाराम शिंदे, सुनीता शिंदे (जालना), सोनू दिलीप जाधव, दिलीप जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खात्री करूनच सोयरीक करा
सदरील प्रकार गंभीर आहे. यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. समाजात असे प्रकार घडण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या ठिकाणी सोयरीक करायची त्यांची पूर्ण खात्री करूनच सोयरीक करा, जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही. - अभिजित मोरे, एपीआय, पारध ठाणे.

बातम्या आणखी आहेत...