आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल लंपास:बदनापूर शहरात जिनिंग फोडली; मुद्देमाल लंपास

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका जिनिंगच्या पाठीमागील भिंतीवरून आता प्रवेश करून चोरट्यांनी तांब्याचे कॉइल, वायर प्लेट व ऑइल असा एकूण १ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना बदनापूर येथे घडली.

जालना शहरातील चौधरीनगर भागात राहणारे भरतकुमार वरजलाल सोनी यांचे बदनापूर येथे प्राइम कॉटेक्स जिनिंग आहे. यामध्ये तांब्याचे कॉईल, वायर प्लेट असे साहित्य ठेवण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री जिनिंगचा वीजपुरवठा खंडित झाला होता. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी जिंनिगच्या पाठीमागील भिंतीवरून आत प्रवेश केला. चोरट्यांनी १ लाख ७ हजार रूपये किंमतीचे तांब्याचे कॉईल, वायर प्लेट व ऑइल चोरून नेले आहे. रविवारी सकाळी भरतकुमार सेलानी हे रविवारी सकाळी आले असता, त्यांना चोरी झाल्याचे कळाले, याची माहिती बदनापूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...