आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:प्रशिक्षणार्थी शिक्षकांना वरिष्ठ, निवड श्रेणी द्या

वडीगोद्री6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी तत्काळ लागू करण्यात यावी,अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले, बारा व चोवीस वर्षांच्या अर्हताकारी सेवेनंतर राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू आहे. प्रशिक्षण नसल्याचे कारण सांगून सरकारने हजारो शिक्षकांना या लाभांपासून वंचित ठेवले होते. वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण आयोजित करण्याची मागणी मराठवाडा शिक्षक संघाने राज्य शासनाकडे वारंवार केली होती. त्याला यश येऊन यावर्षी वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले गेले. पात्र शिक्षक गेले पंचेचाळीस दिवस प्रशिक्षण घेत होते.

शिक्षकांनी सदरील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आता वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षण शिक्षकांनी पूर्ण केले असल्याने आता वेळकाढूपणा न करता प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी तत्काळ लागू करण्यात यावी, अशी मागणी विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, ज्ञानोबा वरवटे, प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, संजय येळवंते, भीमाशंकर शिंदे, जगन वाघमोडे, भागवत काकडे, गौतम बनसोडे, एफ. एस. सय्यद, नारायण मुंढे, हकीम पटेल, भगवान धनगे, गणेश चव्हाण, सिरस, प्रद्युम्न काकड, दीपक शेरे, विष्णू इप्पर, रमेश गाढे यांनी केली आह

बातम्या आणखी आहेत...