आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकांद्याला तीन हजार रुपये हमीभाव देण्यात यावा नसता तर राज्यभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा रासपा च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावर्षी राज्यात कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवक चांगली आहे. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी प्रति क्विंटल १५०० रूपये खर्च येतो. परंतु, बाजारात ३०० ते ५०० रूपये क्विंटल दराने कांदा विकला जातो आहे.
यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहे. तरी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १ हजार रूपये अनुदान देण्यात यावे, यापुढे कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार रूपये हमीभाव देण्याचा शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा आमदार महादेव जाणकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रासपा नेते ओमप्रकाश चितळकर, विनोद मावकर, पुंजाराम खर्जुले आदींनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.