आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर सर्व आस्थापना मालकांनी त्यांच्याकडील कामगारांना १८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत मतदानाचा हक्क बजावता यावा मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ. मा. जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
निवडणूक होणाऱ्या ज्या ग्रामपंचायत लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहतीत मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत, अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीमधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यादृष्टीने मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटीची विशेष सवलत देण्यात यावी असे राज्य निवडणूक आयोगाने १४ डिसेंबरच्या पत्रान्वये तसेच उपजिल्हाधिकारी यांनी त्यांच्या १५ डिसेंबरच्या पत्रान्वये आदेशित केल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.