आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्सिजनचा तुटवडा:राज्यात ऑक्सिजन खरेदीसाठी काढणार ग्लोबल टेंडर : आरोग्यमंत्री राजेश टाेपे

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मेडीकल ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून केंद्र सरकारने ज्याप्रमाणे ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढले, त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकार २०-२५ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन खरेदीचे टेंडर काढणार आहे. यासोबतच रेमडीसिविर, कॉन्सन्ट्रेटरचीही खरेदी करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टाेपे यांनी रविवारी सांगितले. जालन्यात रविवारी अग्रसेन भवन येथे जम्बो कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री टोपे म्हणाले की, ऑक्सिजनचे रिकामे टँकर नेण्यासाठी एअरलिफ्टींग करण्यात येणार आहे. एअरफोर्सच्या माध्यमातून गुजरातमधील रिलायन्स पेट्रोकेमिकल्स येथून हे टँकर जातील व उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून ऑक्सिजन भरून महाराष्ट्रात येतील. दरम्यान, केंद्र सरकारने येत्या ३० एप्रिलपर्यंत राज्यासाठी २ लाख ६९ हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा कोटा निश्चित केला होता. मात्र, रुग्णसंख्येच्या तुलनेत ही संख्या कमी असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकत्याच झालेल्या बैठकीत वाढीव इंजेक्शनची मागणी करण्यात आली होती. याचा विचार करून केंद्र सरकारकडून दुप्पट म्हणजे साडेचार लाख रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे, यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचेही टोपे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...