आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद येथे पार पडलेल्या लॉयन्स क्लबज् इंटरनॅशनल अंतर्गत ३२३४ च्या ५ व्या बहुप्रांतीय अधिवेशनात लॉयन्स क्लब ऑफ जालनाला प्लॅटीनियम, ग्लोबल मेंबरशिप, जीएमटी आदी अवार्ड प्रदान करण्यात येऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, बहुप्रांतिय अध्यक्ष विवेक अभ्यंकर, माजी डायरेक्टर डॉ. नवल मालु, नरेंद्र भंडारी, प्रेमचंद बाफना, संजय खेतान, राजेंद्र दर्डा, दिलीप मोदी, पुरुषोत्तम जयपुरिया, कमलबाबू झुनझुनवाला, विजय दाड, अतुल लड्ढा यांची उपस्थिती होती.
यावेळी लॉयन्स क्लबच्या अध्यक्ष मिनाक्षी दाड यांनी सुंदर कलात्मक स्क्रैप बुक बनवुन उत्कृष्टरीत्या सादरीकरण केल्याबद्दल ३५० क्लब असलेल्या बहुप्रांतात प्लॅटीनियम अवार्ड देऊन गौरवान्वित करण्यात आले. लॉयन्स क्लबच्या माध्यमातून दाड यांनी विविध प्रकल्प राबविले.
महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन, प्रोस्टेट ग्रंथी, पॅप्समियर टेस्ट, मेमोग्राफी, बोन डेंसिटी चेकअप, बाल ह्रदयरोग तपासणी, मुळव्यध, भगंदर, फीशर, पेन्डिक्स तपासणी मोफत शस्त्रक्रिया, मुत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, बॉवेन थेरीपी, फीजीओथेरीपी, ऑनलाइन शिबीर, बॅंकींग क्षेत्रांतर्गत मार्गदर्शन, विविध प्रशिक्षण कार्यशाळा, अंबड, राणी उंचेगाव, रेवगांव, दहिफळतांडा, सिंदखेडराजा अशा गावोगावी तपासणी शिबिराचे आयोजन, विविध संस्थांना जोडुन कार्य करण्याची प्रणाली, मुक्या जनावरांसाठी कार्य करुन समाजामध्ये लॉयन्स क्लबची चांगली प्रतिमा सामान्य जनतेच्या डोळ्यासमोर उभारली, वेळोवेळी वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेपर्यंत या शिबीरांची माहिती पोचवल्याबद्दल पोहचविण्या जालना क्लब ना इमेज बिल्डिंग चा प्लॅटीनियम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावर्षी क्लबच्या उल्लेखनीय कार्यामुळे प्रभावित होऊन ३९ नवीन सदस्य क्लबची जोडल्या गेल्याबद्दल ग्लोबल मेंबरशिप टीमचा सिल्वर अवार्ड क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी दाड यांना प्रदान करण्यात आला. बहुप्रांतात बेस्ट क्लब सचिवचा सिल्वर अवार्ड सचिव जयश्री लढ्ढा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.