आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:प्रतिकूल परिस्थितीत 92 टक्के गुण मिळवणाऱ्या सूरज महाराज यांचा गौरव

टेंभुर्णी2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरची परिस्थिती अत्यंत बेताची आई-वडिलांचे शिक्षण जेमतेम अशा परिस्थितीत शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहून शेतीतील कामे करण्यासह शिक्षण घेणाऱ्या सूरज महाराज या विद्यार्थ्याने ९२ टक्के गुण मिळवून नळणी येथील प्रा. आर. टी. गावंडे विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला.

सूरजचे वडील राजू व आई कविता यांचा शेतीचा व्यवसाय शेतात राबून शिक्षण घेणारा सूरज याला शिक्षणाची पहिल्यापासून आवड यातच पालकांच्या सहकार्याने तो शेती काम नाही करीत व शिक्षणही घेत दहावीच्या परीक्षेत नळणी येथील विद्यालयात त्याने विशेष प्रावीण्य मिळवत ९२ टक्के गुण मिळविले प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. या यशाबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. रमेश गावंडे, सुजाता गावंडे, प्राचार्य प्रदिप पाटील भोपळे, प्रा.सचिन वाकडे, प्रा. कृष्णा शेलार, प्रा.भरत पडोळ, प्रा.गणेश दधरे, प्रा.राजू इंगळे, भागवत देठे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...