आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:गोर सेनेचा मुंबईत 11 मे रोजी क्रांतिकारी मोर्चा; जिल्हाध्यक्ष राठोड यांची माहिती

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसींसह मागासवर्गीय घटकांना मिळत नसलेले संविधानिक हक्क, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण अबाधित राहावे, जात वैधता प्रमाणपत्रासाठी येत असलेल्या अडचणी, अशा ज्वलंत समस्यांकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर गोर सेनेच्या वतीने येत्या ११ मे रोजी विराट क्रांतिकारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जालना जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी सोमवारी दिली.

राठोड पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द ठरवल्यानंतर गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण व प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण यांच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यात निवेदने, चक्री उपोषण, रास्ता रोको आंदोलन, अशा लोकशाही मार्गांचा अवलंब करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सुभाष राठोड यांनी न्याय हक्क परत मिळावे, यासाठी मोर्चात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...