आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शासनाने गणेशोत्सवातील सर्व निर्बंध उठवले; जिल्ह्यातील गणेश मंडळांमध्ये यंदा उत्साहाचे वातावरण

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. या अनुषंगाने सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन चर्चात्मक नियोजन करणे सुरू झाले आहे. या वेळी यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठीही नियोजन सुरू झाले आहे.

या वेळी झालेल्या चर्चेत अनेक मंडळाच्या पदाधिकारी वर्गाने सहभाग घेत गणेशोत्सव काळात स्वच्छता, नाले सफाई, दिवाबत्ती यावर आपल्या प्रश्नांचे निराकरण करून घेत आहेत. कार्यकर्ते सार्वजनिक मंडळांना मार्गदर्शन करीत आहेत. ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाचे आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. कोणत्या भागात गणेशोत्सव राहणार आहे, कोणत्या ठिकाणी जुने मंडळ आहे, नव्याने काय करता येईल, याबाबत नियोजन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवावर चर्चा घडवून या वेळी मंडळाने गणेशोत्सव काळात मंडळ व गणेश भक्तांनी कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले. यंदा शासनाने गणेशोत्सवातील सर्व निर्बंध उठवले आहेत. निर्विघ्नपणे गणेश मंडळांनी गणेशोत्सवाच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले जात आहे. यंदा उत्साहाचे वातावरण असून अगदी श्रींच्या पीओपी मूर्तींना पण सशर्त मान्यता दिलेली आहे. या मूर्तींच्या उंचीसंदर्भात व अन्य विषयांवर चर्चा करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यात बऱ्हाणपूर, पुणे येथून गणेश मूर्ती येण्यासाठी विशेष नियोजन केले जाते. जालना शहरातील विविध मंडळांकडून या ठिकाणांहून मोठ्या मूर्ती आणल्या जातात. यावर्षी किती उंचीची मूर्ती असावी याबाबतचे अजूनही नियोजन ठरलेले नाही. यामुळे नगरपालिकेकडून काय निर्णय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पसंती
जालनेकरांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून पाठपुरावा केला जातो. यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्नही होत असतो. जालना शहरात विशेषकरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.

बातम्या आणखी आहेत...