आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत साहित्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असा निर्णय सरकारने घ्यावा, समाज प्रबोधन करताना मी नेहमी खरे बोलतो म्हणूनच माझ्यामागे रोज नवीन लफडे लागतात. माणसाला माणसासारखे जगू द्यावे, हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख यांनी भोकरदन येथे आमदार संतोष दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात समाज प्रबोधन करताना केले.
या कीर्तनाला आमदार संतोष दानवे, भास्कर दानवे, संतोष महाराज आढावणे, आशा पांडे, यांची विशेष उपस्थिती होती. १५ डिसेंबर रोजी भोकरदन शहरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर पांडे परिवाराच्या वतिने आयोजीत निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन संपन्न झाले. कीर्तनात हरि पाठातील अभंगावर निरूपण करताना निवृत्ती महाराजांनी माणसाच्या जीवनात असलेले भक्ती व ज्ञान योगाचे महत्त्व विषद केले. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या खास विनोदी शैलीमध्ये समाजाचे प्रबोधन करताना त्यांनी सध्या सर्वत्र सुरु असलेल्या मोबाईलच्या अतिवापराबद्दल त्याचे दुष्परिणाम ही सांगितले. कोरोना काळामध्ये माणसाला आपल्या माणसाची किंमत कळाली आपल्या माणसांना चांगल्या आणि वाईट गोष्टीबद्दल खरे आणि परखड बोललेच पाहिजे माणसाने इंद्रियाचे गुलाम होऊन व्यसनाधीन होऊ नये त्याचप्रमाणे माणसाचे सत्ता संपत्ती सगळे गेलं तरी चालेल मात्र आपला स्वाभिमान कधीही सोडू नये असेही महाराजांनी सांगितले. आहाराबद्दल बोलताना निवृत्ती महाराज म्हणाले की सध्या समाजामध्ये ८० टक्के लोक केमिकल युक्त अन्न खातात.
त्यामुळे निरी व्यसनी व्यक्तींनाही कॅन्सर सारखे भयंकर आजार होतात. कोरोना पेक्षाही कॅन्सरग्रस्त होऊन मृत्यूचे प्रमाण मोठे झाले आहे. सध्या प्रत्येक मनुष्य हा तणावग्रस्त असल्याने हृदयविकाराचे ही प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी माणसाने नेहमी तणावमुक्त राहावे अध्यात्माकडे वळावे, असेही त्यांनी आवाहन केले. सिनेमा निर्मिती बद्दल बोलताना निवृत्ती महाराज म्हणाले की संत व शूर वीराच्या जीवन चरित्राची खरी माहिती व इतिहास पूर्ण माहीत असल्याशिवाय सिनेमे काढू नये समाजातील निर्माण होईल असे वाद उत्पन्न करू नये.
निवृत्ती महाराज देशमुख यांनी आपल्या खास विनोदी शैलीत कीर्तनासह निरूपण करून समाज प्रबोधन केले कीर्तनाला भोकरदन जाफराबाद तालुक्यातील हजारो भाविक भक्तांची व महिलांची मोठी उपस्थिती होती निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाला भोकरदन येथील ह भ प संतोष महाराज आढावणे कुंभारीकर यांच्यासह त्यांच्या भजनी मंडळाने व टाळकरी, मृदंगाचार्य यांनी साथ संगत केली .आमदार संतोष दानवे यांच्या वाढदिवसानिमीत्त भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम जाधव संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे प्राचार्य माणिक दानवे यांच्यासह हसनाबाद येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. भोकरदन येथे गरजूवंत व्यक्तींना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ब्लॅंकेटचे वाटप केले आहे.
व्यसनांवर आळा आणण्यास पुढाकार घेण्याची गरज
कीर्तनामध्ये महाराजांनी विविध विषयावर ते मार्गदर्शनही केली वाढत्या अपघाताबद्दल त्यांनी सांगितले तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली असून दारूचे व्यसनाबरोबर मोबाईलचेही मोठे व्यसन झाल्याने अपघात होत आहेत. अपघात होऊन त्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी पोलिसांनी वाहन चालकावर कारवाई करावी असेही निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी किर्तनातून मार्गदर्शन करतांना सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.