आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथविधी:शपथविधीसाठी प्रांतपाल जयपुरिया कॅनडाला रवाना; 22 ते 23. जून रोजी होणार आंतरराष्ट्रीय संमेलन

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉयन्स क्लब डिस्ट्रिक्ट (३२३४ एच २) थ्री. टू. थ्री .फोर.एच. टू चे प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरीया हे मोंटेरियल (कॅनडा ) येथे शपथविधी सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्याकरिता शुक्रवारी रवाना झाले. त्यांना औरंगाबाद, जालना व जळगाव लॉयन्स परिवाराच्या वतीने निरोप देण्यात आला. २२ ते २३ जून या कालावधीत कॅनडा येथे लॉयन्सचे आंतरराष्ट्रीय संमेलन होत आहे. संपूर्ण जगभरातील नवनिर्वाचित प्रांतपाल शपथ घेणार आहेत. निरोप समारंभ कार्यक्रमात दिलीप मोदी, नवल मालू, विवेक अभ्यंकर, सुनील देसरडा, गिरीश शिसोदिया, संदीप मालू, विजय बगडिया, महावीर पाटणी, तनसुख झांबड, राजेश भारुका, राजेश राऊत, राहुल औसेकर, सुभाषचंद्र देवीदान, अरूण मित्तल, विजय गिंदोडिया, राजेश कामड, अतुल लढ्ढा, अशोक हुरगट, शाम लोया, रामदेव श्रोञीय, राजेश देवीदान, मोहन इंगळे, घाडगे, दिनेश लोया, विनोद पवार, धर्मेंद्र कुमावत, राजेश भूतिया, राधेश्याम टिबडेवाल, डॉ. गिरीश पाकनीकर, जयप्रकाश श्रीमाळी, बालाप्रसाद भक्कड, ललित बिजावत, कमल किशोर बगडिया, राजेश लुणिया, नंदकिशोर अग्रवाल, रामनारायण अग्रवाल, मुरारीलाल गुप्ता, हनुमान प्रसाद भारूका, द्वारकादास मुंदडा, सुरेश मुथा, लक्ष्मीकांत कंकाळ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...