आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. या सर्वमंडळी बाहेरील राज्यातील व एका विशिष्ट पक्षाचे प्रवक्ते नेते असून,याचा निषेध विविध स्तरावर केला जात आहे.
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदी, लोढा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच अश्या मनोवृत्तीचा आवर घालण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारु असे स्वराज्य संघटनेचे विकास भाऊ जाधव यांनी सांगितले. याप्रसंगी अमरजीत देशमुख, पप्पू सपकाळ, गोकुळ सपकाळ यांनी मनातील आक्रोश जाहीर करुन लवकरच राज्यकर्ते विरोधात आंदोलन पुकारले जाईल असे सांगितले.
यावेळी स्वराज्य संघटनेचे पदअधिकारी योगेश सपकाळ,रामू दौड,सुरज मव्हारे, दिपक जाधव, शिवराज पालोदे, आनंदा कानडजे,रवीराज बावस्कर, रोहीत देशमुख, पंजाबराव सपकाळ,गणेश देशमुख, अनिल काकडे, राम बनकर, विक्रम दांडगे कृष्णा सोनवणे, गजेंद्र फाळके, दीपक सोनवणे, मयूर देशमुख,अमोल काळे, ज्ञानेश्वर देशमुख, सागर सपकाळ, आकाश फाळके, विकास देशमुख आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.