आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादरवर्षी रब्बी हंगामात गहू व मका पिकाची लागवड करणारा भोकरदन तालुक्यातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून कमी खर्चात व कमी पाण्यात तसेच इतर पिकाच्या तुलनेत अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करीत आहे. यंदादेखील कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रब्बी हंगामात हरभरा पिकानेच आघाडी मारली आहे.
तालुक्यात जवळजवळ १८ हजार ९४१ हेक्टरवर हरबरा पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या बहुतांश ठिकाणी हरभरा पिकावर मर व अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी औषधी फवारणी करीत अळीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तालुक्यात आतापर्यंत ४३ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे.आणखी २७ हजार हेक्टर पेरणी होणार असल्याचा कृषी खात्याचा अंदाज आहे. परतीच्या पावसाने धुव्वाधार हजेरी गेल्या तीन ते चार वर्षापासून तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे.या पावसामुळे नदी,नाले,तलाव खळखळून वाहत आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वञ जलसाठा उपलब्ध आहे.
विहिरी बोअरवेल तुंडुंब भरले आहेत.खरीपात पिके ऐन काढणीला आली असता परतीच्या पावसाने धुमाकुळ घातल्याने सोयाबीनसह कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा हतबल झाला. शेतकऱ्यांनी पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी केली.त्यानुसार प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले.माञ अद्याप भरपाई मिळाली नाही.आता शेतकऱ्यांची भिस्त पूर्णतः रब्बीवर आहे.तालुक्यात पावसाने वार्षीक सरासरी ओलांडली आहे.त्यामुळे सगळीकडे पाणी डबडब करीत आहे.यंदा रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी देखील खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन काढलेल्या क्षेत्रावर मका व जेथे सिंचनाची सोय आहे तेथे हरभरा व गहू पिकाची पेरणी केली आहे.
गतवर्षी हरभरा पिकाला बाजारात भाव चांगला होता.त्यामुळे यावर्षी शेतकरी डाँलर हरभरा बियाणाची पेर मोठ्या प्रमाणात केली आहे.त्या पाठोपाठ मका व गव्हाची देखील पेरणी केली आहे.सध्या शेतकरी पिकांना पाणी देण्यात व्यस्त आहे.दरम्यान मागील वर्षी पर्जन्यमान चांगले झाले होते.त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कोरडवाहु जमिनीवर देखील मका व गव्हाची लागवड केली होती.शेवटच्या टप्प्यात विहिरीतील पाणी आटल्याने पिंकाना पाणी कमी पडले.
चार एकर हरभरा पेरला
मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील चार एकरात हरभरा पेरणी केली आहे. कमी खर्चात व कमी पाण्यात येणारे पीक आहे. सध्या हरभरा पिकावर मर व अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे कृष्णा बेराड हे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.