आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्ध पाणी:जल जीवन मिशनअंतर्गत खामखेडा येथे ग्रामसभा ; देखभाल दुरुस्तीसाठी केली लोकवर्गणी

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गणेशपुर यांच्यावतीने जाफराबाद तालुक्यातील खामखेडा येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामसभा घेण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले.प्रारंभी गावातून शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढण्यात येऊन जल जीवन मिशन बाबत विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे सचिव एम. डी.सरोदे यांनी ग्रामस्थांना जल जिवन मिशन योजनेच्या चे महत्व सांगितले.

तर आपल्या गावातील पाण्याची समस्या ही कायमची हद्दपार ही जल जीवन मिशन अंतर्गत होणार आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीस ५५ लिटर शुद्ध 💧पाणी मिळणार आहे. खामखेडात १०० % टक्के नळ जोडणी झालेली आहे, असे ग्रामसेवक अल्ताफ शेख यांनी सांगितले. यावेळी 👉धानोरा गावातील ग्रामस्थांनी १० % टक्के लोकवर्गणी भरण्यासंदर्भात होकार दर्शवला असून लवकरच लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली जाईल, असे शेख म्हणाले. यावेळी सरपंच सुमनबाई बोऱ्हाडे, ग्राम पंचायत सदस्य यमुना जाधव, संगीता जाधव, विक्रम झिणे, सुखदेव वरगणे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, जल जीवन मिशन प्रकल्पास गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, प्रकल्प संचालक अनुपमा नंदनकर, गटविकास अधिकारी विष्णु बोडखे, संजय डोंगरदिवे, एन. टी. खिल्लारे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...