आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा होणार सन्मान:आज जांबसमर्थ गावात कृतज्ञता सन्मान सोहळा

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील चोरी झालेल्या मूर्तींचा शोध नुकताच लागला असून त्या मूर्तींचा पुनःस्थापना सोहळा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. जांबसमर्थ श्रीराम मंदिरात या सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे.

सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या घराण्याच्या देवघरातील अर्थात जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील देव देवतांच्या पंचधातूंच्या प्राचीन मूर्ती काही दिवसांपूर्वी चोरी गेल्या होत्या. सदरील कृतज्ञता सन्मान सोहळ्यास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतूल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, आमदार बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, संतोष दानवे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार विलासराव खरात, शिवाजी चोथे, समृध्दी कारखान्याचे सतीश घाटगे, डॉ. हिकमत उढाण, अंबादास अंभोरे, अॅड. अर्जुन राऊत, आचार्य तुषार भोसले, डॉ. नितीन खंडेलवाल, तसेच जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, चोरी प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपअधीक्षक सुनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, संजय लोहकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. समर्थ भक्तांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भूषण स्वामी यांच्यासह माजी सरपंच राजेंद्र तांगडे, गोपाळराव तांगडे, अक्षय तांगडे, सोपान राक्षे, शेख मुस्तफा, रामेश्वर तौर, नामदेव देवकर, प्रदीप तांगडे, गुलाब तांगडे, अ‍ॅड. गजेंद्र तांगडे, अ‍ॅड. श्याम तांगडे, राजेश तांगडे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...