आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:महिला बचत गट, अंगणवाडी सेविका यांचे गावांच्या प्रगतीत मोठे योगदान

दानापूर/फत्तेपूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जि.प.सदस्या जंजाळ यांचे प्रतिपादन, उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार

ग्रामीण भागातील महिलांनी दोन दशकांमध्ये बचतगट तसेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मोठे बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे त्या स्वयंपूर्ण झाल्या. अंगणवाडी सेविकांनी कोरोनाकाळात आणि शासनाच्या उपक्रमात सहभाग घेऊन गावाला मोठा हातभार लावला आहे. यामुळे गावांच्या प्रगतीत त्यांचा मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या मनीषा जंजाळ यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील भायडी येथे बचतगट भवनात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून पोलिस उपनिरीक्षक वैशाली बोर्डे, प्रेषित मोघे, कल्याणी जोशी, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी आर. बी. जाधव, लोकजागर संघटनेचे केशव जंजाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. डी. महाजन, समुदय अधिकारी पूजा राठोड, रईस पठाण, विमल दांडगे, मारुती गावंडे, बालाजी ठाले, भाऊसाहेब पिसे, शेख जुबेर, नामदेव पोटे, सरपंच रेखा जंजाळ, उपसरपंच गंगा दसपुते उपस्थित होत्या. महिलांनी एखादा उपक्रम यशस्वी करण्याचे ठरविल्यास त्याचे चांगले परिणाम नेहमीच दिसून आले आहेत.

आई, पत्नी अशा विविध जबाबदाऱ्या महिला अत्यंत सकारात्मक पद्धतीने आणि मोठ्या धैर्याने सांभाळत आहेत, असे जंजाळ म्हणाल्या. या वेळी आशा सेविका व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील महिला, पुरुष अशा ३५० जणांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र, साडी, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात क्रीडा क्षेत्रात गोल्डन बुक वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त श्वेता गजानन काकळे, सार्थक काकळे, सैनिक रामेश्वर दसपुते आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमात बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर घनवट यांनी तर ईश्वर वाघ यांनी आभार मानले. या वेळी परिसरातील विविध महिला बचत गटांच्या पदाधिकारी, महिला आदी उपस्थित होते.

बचत गटामधील महिलांसाठी माझा लढा सदैव असाच चालू राहील : जंजाळ
आजच्या परिस्थितीत महिलांनी एकत्रित येऊन संघटन केले पाहिजे. आज प्रत्येक शासकीय कार्यालयात आपण महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्याप्रमाणे आपण आपल्या ग्रामीण भागातील महिलांनी देखील बचत गटाच्या माध्यमातून चांगले काम करून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे. बचत गटामधील महिलांसाठी माझा लढा सदैव असाच चालू राहील, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्या मनीषा जंजाळ यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...