आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलमध्ये गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त अभिवादन

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चौधरी नगर येथील भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा रेवतीताई मांटे, संस्थेचे सचिव प्रोफेसर डॉ. सुखदेव मांटे, प्राचार्या लतिका मनोज, उपप्राचार्य एलीया गायकवाड, वरूण अंबेकर यांची उपस्थिती होती. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिक्षक अभिजित भंडारे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी अपर्णा भंडारे, सोनाली खंदारे, रवींद्र गिरे, महेंद्रसिंग परदेशी, मोहिनी श्रीवास्तव, गिरीराज कुलकर्णी, रेखा शेळके, वर्षा जयरंगे, अलकनंदा घुले, प्रियंका शिंदे, सचिन टेकुर, लक्ष्मी ठोकरे, शोभा जगधने, लता काळे, नारायण मोरे, राजू काकड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...