आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:गोद्री येथे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन ; विविध सामाजिक उपक्रम घेऊन जयंती उत्सव साजरा

भोकरदन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील गोद्री येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजिन सामाजिक कार्यकर्ते राजीव निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली २८ रोजी करण्यात आले होते. यावेळी आमदार संतोष दानवे यांनी हजेरी लावली.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामाजिक उपक्रमांतर्गत भारतीय सैन्यातील सैनिकांचा आणि शिक्षकांचा सपत्नीक सत्कार तसेच निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आमदार संतोष दानवे, जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार संतोष दानवे, जिल्हा परिषद सदस्य आशा पांडे यांच्या सह उपस्थित मान्यवरानी मार्गदर्शन केले. त्यानंतर सायंकाळी आदर्श कला पथक यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, विजय कड, बालू औटी, शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू आहरे, सुभाष जंजाळ, माजी सरपंच बालाजी ठाले, सरपंच श्रीरंग भवर, शेख अयूब यांच्या सह भोकरदन तालुक्यातील समाज बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती.

बातम्या आणखी आहेत...