आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी येथे करण्यात आले अभिवादन

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी येथे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिपप्राशा सारवाडीच्या मुख्याध्यापिका विश्वलता गायकवाड ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सारवाडी येथील सरपंच नीलावती जनार्दन काळे ह्या उपस्थित होत्या. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता काळे, सदस्य विलास नरवडे हे देखील उपस्थित होते.

सर्वप्रथम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी अभिवादन केले. या थोरनेत्याच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे विद्यार्थ्यानी केली. कार्यक्रमासाठी शिक्षक ज्ञानेश्वर गिराम यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन शिक्षक चक्रधर बागल तर आभार जनाबाई भुंबे ह्यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...