आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कामे:माथा ते पायथा भूजल पातळी वाढवता येईल

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जल व मृद संवर्धनाची विविध कामे हाती घेऊन खोलवर गेलेली भूजल पातळी वाढवता येईल.यासाठी माथा ते पायथा बांधबंदिस्ती, सीसीटी, दगडी बांध, वृक्षारोपण, विहीर पुनर्भरण, माती नाला बांध,भूमिगत बंधारे आदी उपक्रम घेऊन भूजल पातळी वाढवता येईल असे प्रतिपादन कार्ड संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे यांनी केले.

जालना तालुक्यातील धामणगाव, दगडवाडी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सरपंच अनिल साळवे, ग्रामसेवक भरत मुरमे, कृषी सहाय्यक आर. के. राठोड, रोजगार सेवक मुरलीधर राठोड, पोलिस पाटील काकासाहेब खैरे, माजी सरपंच तुकाराम चव्हाण, मंजाराम मस्के, भाऊसाहेब रगडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या पुढाकारातून कुंडलिका, सीना नदी पुनर्जीवन अभियान हाती घेण्यात आले आहे. तर गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्ड संस्थेच्या वतीने बदनापूर तालुक्यातील ११ गावांमध्ये कुंडलिका नदीचा उगम असल्याने उगम ठिकाणीच नदीचे वरील उपक्रम राबवून पुनर्जीवन करता यावे. यासाठी कृती आराखडा नियोजन बैठक घेण्यात आली. कुंडलिका आणि सीना नदीचा समावेश असुन सिना नदीचे समन्वयक विष्णुपंत पिवळ यांनी नदीचा उगम कसा निर्माण होतो व तो कसा संवर्धन करता येईल यावर मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सरपंच अनिल साळवे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...