आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेकरिता मार्गदर्शन व समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता सुरू होणार आहे. याचा विद्यार्थी तसेच पालकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगावचे प्राध्यापक डॉ. संजय चिकलठाणकर हे मार्गदर्शन करणार आहेत. हे मार्गदर्शन २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागेवाडी, जालना येथे होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती, पण या शैक्षणिक वर्षांपासून हीच प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने चालू झाली आहे. जालना जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कागदपत्र पडताळणी व नोंदणी प्रक्रियेचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र शासनाचे सुविधा केंद्र २१३८ हे मत्स्योदरी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नागेवाडी येथे आहे. या सुविधा केंद्रावर जाऊन सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी.
प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे
यंदाची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन असल्यामुळे सर्व मूळ कागदपत्रे सुविधा केंद्रात सादर करणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थी मूळ कागदपत्रे सादर करण्यात असमर्थ ठरला तर मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्याचे नाव येणार नाही. शिवाय अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया ही समजून घेऊन नोंदणी करावी.
-डॉ. एस. के. बिरादार, प्राचार्य, मत्स्योदरी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.