आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:राणीउंचेगावात खताची बचत व योग्य वापराबाबत मार्गदर्शन

राणीउंचेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह मोहिमेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना खरीप पिकावर मार्गदर्शन, खताची बचत आणि योग्य वापर कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ सचिन धांडगे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून खताचा योग्य वापर करता येईल.

१० टक्के खताची बचत करण्यासाठी, रासायनिक आणि जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया, बीबीएफ पद्धतीने पेरणी कशी करता येईल बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्याने कोणते कोणते फायदे आहेत लिंबोळी अर्क तयार करणे गांडूळ खत व सेंद्रिय खत यांचा वापर करून जमिनीची सुपीकता कशी टिकवता येईल असे सागितले. यावेळी आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक गाढवे, मंडळ कृषी अधिकारी पुरी, कृषी सहाय्यक के. जी. कचकलवाड, वाय. सी. तांगडे, सरपंच विठ्ठल खैरे, बाळू शिंदे, अशोक घुमरे आदी उपस्थित होते.