आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबा चर्चासत्राचे आयोजन:साळेगाव घारे येथे आंबा लागवडीवर मार्गदर्शन; आंबा चर्चासत्र आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन

सिंधी काळेगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील साळेगाव घारे येथे आंबा लागवड चर्चासत्र आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील केसर आणि गुजरात मधील केसर आंब्यामधील फरक शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आला आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन व महा केसर आंबा बागायतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घन लागवड आंबा चर्चासत्र आणि शेतकरी मेळाव्याचं साळेगाव घारे येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं.

तर या कार्यक्रमाला डी एल जाधव विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, डॉ.भगवानराव कापसे, कृषी अधीक्षक अधिकारी भीमराव रणदिवे, फार्मर कॅार्नर प्रोड्युसर कंपनीचे शाम घारे यांच्यासह अशोक गूळमकर, गणेश बुटरे, भागवत डिखुळे, आकाश गुळमकर, शिवाजी गुळमकर, पुरुषोत्तम घारे, शिवा डिखुळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. साळेगाव घारे येथील शेषनारायण मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...