आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:जिल्हा परिषद शाळेत विविध न्याय, हक्क अधिकार विषयावर मार्गदर्शन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील जिल्हा परिषद प्रशाला मुलांची शाळा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत विविध न्याय, हक्क अधिकार व कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते, जिल्हा न्यायाधीश ए.व्ही चौधरी, मुख्य अतिथी गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे कार्यक्रम आर.आर. अहिर यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता ज्येष्ठ शिक्षक यशवंत कुलकर्णी, शिवनंदा मेहत्रे, संजय कायंदे, जरीना अख्तर, फरहीन तब्बसुम, मो.मुजम्मील, संजीवनी वाघमारे, नजमा शेख, ऋतुजा तोटे, लतीफ शेख, शिल्पा झोल, मिलिंद शामकुवर, वैशाली काकडे, दिगंबर गुळसकर, रायमल यांनी परिश्रम घेतले. यावेळी गट समन्वयक पी. आर. जाधव यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी व यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कायंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन गीता नाकाडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...