आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेचे आयोजन:शैक्षणिक गुणवत्ता,उपक्रम, युडायस संदर्भात मार्गदर्शन

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक मंगला धुपे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ नोव्हेंबर रोजी प्रशाला जाफराबाद येथे विविध शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता तसेच युडायस संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत शाळेच्या सद्यस्थितीची माहिती युडायसमध्ये भरतांना कोणती काळजी घ्यावी, माहितीची नोंद कशी घ्यावी यात शाळा खोल्या, दुरुस्ती, नवीन मागणी, स्वच्छता गृह, किचनशेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्रंथालय, प्रयोगशाळा, रॅम्प इत्यादी भौतिक सुविधाची नोंद करणे, प्रवर्गनिहाय विद्यार्थी संख्या, दिव्यांग २१ प्रकारातील विद्यार्थ्यांची नोंद, कला, विज्ञान वाणिज्य तसेच विविध होकेशनल कोर्सेससाठी प्रवेशीत विद्यार्थी संख्या यांची नोंद कशी घ्यावी याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्र माहिती भरण्यासाठी वर्गशिक्षकांची मदत घेऊन मुख्याध्यापकांनी अचुक माहिती भरावी असे आवाहन गटशिक्षणाधिकारी जाफराबाद डॉ. भरत वानखेडे यांनी केले. याप्रसंगी निपुण भारत अंतर्गत माता पालक गट तयार करणे, स्थलांतरित विद्यार्थी शोध व प्रवेश, स्वच्छता माॅनिटर टॅग व्हिडिओ, मा. विभागीय आयुक्त यांचे विविध उपक़म अॅस्ट्रोनाॅमी क्लब, प्रयोगशाळा, ग्रंथालय, परमवीर चक्र विजेते, नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ, थोर पुरुष जयंती उत्सव, अध्ययन स्तर, एफएलएन अंतर्गत मुलभूत क्रिया, वाचन, अंकगणित स्तर उंचावण्यासाठी, विद्यार्थ्यांचा सर्वोतोपरी गुणवत्ता विकास करण्यासाठी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षिय अधिकारी यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी डॉ. भरत वानखेडे यांनी केले. कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक शिक्षण विस्तार अधिकारी जे. डी. काळे, एस. आर. फोलाने, राम खराडे, गटसमन्वयक शेवाळे, युडायस विभाग प्रमुख भानुशे , कनिष्ठ अभियंता, सर्व केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, सर्व मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...