आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:खादगाव येथे खरीपपूर्व हंगाम प्रशिक्षणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बदनापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खादगाव येथे तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्व हंगाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी रुंद वरंबा सरी लागवड तंत्रज्ञान बीजप्रक्रिया व खतांचा कार्यक्षम वापर याविषयी प्रात्यक्षिकासह कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणे विषयी मार्गदर्शन केले.

कृषी सहायय्क वंदना गुमअलवार यांनी प्रास्ताविकात घरच्या घरी पाच टक्के निंबोळी अर्क करण्यासाठी निंबोळ्या गोळा करण्याचे आवाहन केले. ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नये, असे सांगण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...