आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैविक पद्धतीचा अवलंब करावा:एकात्मिक कीड व्यवस्थापनावर शेती शाळेतून केले मार्गदर्शन

वडीगोद्री3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट कॉटन प्रकल्प व राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनांंतर्गत कृषी विभाग अंबडच्या वतीने तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली बारसवाडा येथे शरद वाकडे यांच्या शेतात कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयी शेतीशाळेतून मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी कृषी सहायक अशोक सव्वाशे म्हणाले की, कापूस पिकामध्ये काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.त्याकरिता मशागतीय पद्धतीने आपले शेत तण विरहित ठेवावे,नत्र खताचा अती वापर टाळावा.तसेच यांत्रिकी पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी प्रादुर्भाव ग्रस्त गळलेली पाने नष्ट करावीत.तसेच निळे व पिवळे चिकट सापळे वापरावेत.जैविक पद्धतीचा अवलंब करावा तसेच ५ टक्के निंबोळी अर्क किंवा व्हर्टिसिलियम लेकानी या बुरशीचा वापर करावा.जर वरील पद्धतीने प्रादुर्भाव कमी न झाल्यास शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशके फवारणीसाठी वापरावीत.पण किटकनाशकांची फवारणी ही नेहमी आलटून पालटून करावी.

एकमेकामध्ये मिसळू नये. सद्यस्थितीत लवकर लागवड झालेल्या कापूस पिकामध्ये काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचे पतंग व डोमकळी दिसून येत आहेत. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी एकरी दोन कामगंध सापळे लावावेत व दोन कामगंध सापळ्यामधील अंतर ५० मीटर ठेवावे. तसेच कापूस पिकामध्ये डोमकळी दिसून येत असतील तर त्या प्रादुर्भावग्रस्त पाते व फुलासह नष्ट कराव्यात.गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अथवा अझाडिरेक्टीन १०००० पीपीएम १ मि.लि. प्रति लिटर किंवा १५०० पीपीएम २.५ मि.लि.प्रति लिटर फवारणी करावी. सद्या पिक पाते व फुले अवस्थेत असल्याने पिकांना पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते.अशा वेळी १३:००:४५ या विद्राव्य खताचे १०० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे. असे आवाहन केले. यावेळी सरपंच रामेश्वर खंडागळे, अनिल सावंत, सुखदेव बढे, सचिन सावंत, धर्मराज सुळे, नामदेव गायकवाड, दत्ता गायकवाड, सोपान सुळे, पांडूरंग घायाळ, बाळू घायाळ, अमोल मांगडे, संभाजी गटकळ, संतोष मीठे, अशोक वाकडे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...