आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:मंठ्यात वाहतूक नियमांविषयी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

मंठा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलां-मुलींनी वाहने चालवू नयेत, विनापरवाना वाहन चालवणे अपराध आहे. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिबिर नुकतेच येथील जिल्हा परिषद प्रशालेत घेण्यात आले. पोलिस कॅडेट या उपक्रमांतर्गत नुकतेच एक शिबिर घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येत आहे.

येथील जिल्हा परिषद प्रशालेत सोमवारी विद्यार्थ्यांना शस्त्राविषयी, शारीरिक कवायत, वाहतुकीचे नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे आणि नोडल अधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. मान्टे, जी. एम. घुले, व्ही. एन. लोखंडे यांनी वाहतुकीच्या विविध कायद्याविषयी, भारतीय बनावटीच्या रायफल विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी एन. एस. चौधरी, रणजित बोराडे, आर. एन. चटलोड, के. के. चव्हाण, एस. के. देशमुख, एस. ए. वीरकर, एस. बी. विधाते, बी. के. बोराडे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...