आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तधन:वर्षभरात गुप्तधन, नरबळीच्या प्रयत्नानंतर पानशेंद्र्यात जादूटोण्याचा प्रकार

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जादूटोणा आणि करणीच्या उद्देशाने पानशेंद्रागावाजवळ झाडाला दाभण ठोकून, पूजेचे साहित्य लटकवून ठेवले होते. या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार हाणून पाडला. वर्षभरात नर बळीचा प्रयत्न, गुप्तधन काढण्यासाठीचा प्रयत्न आणि भानामतीचे प्रकार उघडकीस आले आहेत. अंधश्रद्धेची भीती दाखवून लोकांची पिळवणूक करणाऱ्या मांत्रिकांना आवर घालण्याची मागणी होत आहे.

जालना -जामवाडी राेडवर जादुटाेण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या राेडवरील पानशेंद्रा शिवारात महाडुकाच्या झाडाच्या खाेडावर मांत्रिकाने करणी कवटाळ काढण्याच्या उद्देशान दाभणी झाडाच्या आर- पार ठाेकल्या होत्या. त्याशिवाय पूजेच्या साहित्याचा उतारा करुन काळ्या कपड्यामध्ये गुंडाळून ते महाडुकाच्या झाडाच्या फांदीला लटकावून ठेवले होते .

या प्रकारामुळे रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले हाेते. या संदर्भात जांमवाडीचे सजग नागरिक नारायण वाढेकर यांनी जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मधुकर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला व करणी कवटाळाचे साहित्य काढुन घेण्याची विनंती केली. त्याची दखल घेत मंगळवारी पौर्णिमेच्या दिवशी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड , जिल्हा कार्यवाह मनाेहर सराेदे, पदाधिकारी गणेश गव्हाणे] सामाजिक कार्यकर्ते नारायण वाडेकर यांनी सर्व साहित्य काढुन टाकले.

मांत्रिकाला घाबरू नका, हे थोतांड
तंत्र-मंत्र विद्येचा कुणी दावा करत आसेल तर त्याला घाबरु नका. याची माहिती पोलिस, अंधश्रद्धा निर्मूलन समितीला द्यावी असे आवाहन मधुकर गायकवाड, ज्ञानेश्वर गिराम यांनी केले.

प्रकार वाढले, आरोपी मोकाटच
काही दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यातील हिवरा येथे नरबळीचा प्रयत्न उघड झाला.भोकरदन तालुक्यात गुप्तधनासाठी अघोरी पुजा मांडल्याचा प्रकार घडला होता. यातील आरोपीला अटक झाली नाही.

कायदा काय सांगतो
महाराष्ट्र नरबळी व अनिष्ठ प्रथा उच्चाटन आणि जादुटाेना विराेधी कायद्याच्या कलम कलम ८ नुसार जादूटोणा व करणी करण्याच्या प्रकरणात शिक्षा होते. या प्रकरणात मांत्रिक लोकांमध्ये भिती निर्माण करुन पैशाची लूट करतात. शिवाय करणी कल्याची थाप मारत गावात भांडणे लावण्याचा प्रकार करतात. यातून मोठी भांडणे झाल्याचे प्रकारही घडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...