आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरु:गुरू माझं गणगोत, गुरू हीच माउली, गुरू एक तूचि विधाता अचल, गुरुविन सुने सारे विश्व हे सकल

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती जिल्ह्यात शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी विविध शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावून दिवसभर शालेय कामकाज पाहिले.

जिजाऊ स्कूल
जाफराबाद | शहरातील जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा आदर म्हणून या दिवशी संपूर्ण दिवसभराचे शालेय कामकाज पार पाडून उत्कृष्ट व्यवस्थापनाचा आदर्श वस्तू पाठच सादर केला. प्रारंभी प्राचार्य संजय फलटणकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा डॉ.सुरेखा लहाने, परसराम शिरसाट, गौतम गायकवाड, अमोल पाटील, रवींद्र धारकर, गीता पठाडे, मंजुषा बोराडे, सुनिता मोरे, मनीषा म्हस्के, वंदना दुनगहू, नावेद खान, अंकुश पंडित, उमेश जाधव, पंकज लोखंडे, भरत गावंडे, दिनेश काकडे, अमोल राऊत, प्रवीण जगताप, संजय खंदारे, मोहन सोळंकी, रईस खान, विशाल तांगडे, परसराम शिरसाट, सतीश मुट्ठे, देविदास लहाने, सुनील शिंदे, ज्योती खंबाट, सरला राऊत आदी उपस्थित होते. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनावर आधारित एकांकिका सादर केली.

गणपती इंग्लिश स्कूल
भोकरदन | तरुण पिढीला घडवून देशाला बलशाली करण्याचे पवित्र कार्य गुरुजन प्रामाणिकपणे करत असतात.त्यामुळे आपण नेहमीच शिक्षकांच्या पाठीशी असून शिक्षक हेच खरे गुरू असल्याचे उदगार माजी नगराध्यक्षा मंजुषा देशमुख यांनी केले. भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्थेच्या श्री गणपती इंग्लिश/मराठी हायस्कूल, स्व.अ‍ॅड भाऊसाहेब देशमुख मराठी विद्यालय व पायोनियर सीबीएसई स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वयं- शासित दिन म्हणून शिक्षकांची भुमिका पार पाडली. विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन व संस्थेच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संचालक इंद्रजित देशमुख, प्राचार्य डॉ. विश्वास तळेकर, जे.आर. सपकाळे, आर.आर. त्रिभुवन, लता गायके, मनोज लेकुरवाळे, सोपान सपकाळ, पी. बी. रोजेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

रेणुका विद्यालय
मंठा | येथील रेणुका विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य सचिन राठोड, उपमुख्याध्यापक आर.के. राठोड, पर्यवेक्षक डी. एस. बुलबुले, प्रा. सोनाजी कामिटे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य सचिन राठोड यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद करून सांगितले. सूत्रसंचालन सुधाकर शिंदे यांनी तर प्रा.के.बी. चव्हाण यांनी आभार मानले.

समर्थ इंग्लिश स्कूल
जाफराबाद | येथील समर्थ इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक दिनानिमित्ताने स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्वयंशासन दिनानिमित्त सहभागी झालेले विद्यार्थी यांनी अध्यपणाचे कार्य करतांना कशा अडचणी येतात यांचे प्रत्यक्ष अनुभव सांगितले. यावेळी मुख्याध्यापक सुधाकर गोफणे, अंजली जाधव, रेखा साळवे, भारती साळवे आदी उपस्थित होते.

अरुनिमा विद्यालय
जालना | शहरातील अरुनिमा उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब तनपुरे तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियंका भिसे यांची उपस्थिती होती. तनपुरे म्हणाले, जीवन जगत असतांना प्रत्येकाच्या जीवनामध्ये वयाने लहान असो या मोठा यांच्याकडून काही ना काही शिकत असतो. त्यामुळे प्रत्येक माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो त्यामुळे जीवन संघर्षमय आहे, यावर मात करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ज्ञान मिळविण्यासाठी गुरूची आवश्यकता आहे. शिक्षक दिन साजरा करतांना आपण आपल्या जीवनामध्ये एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही तर एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही हेही आपण लक्षात घेतले पाहीजे असे मत व्यक्त केले. यावेळी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक शाम सातपुते यांनी केले. यावेळी विद्यार्थिनी वैष्णवी खर्जुले, करण खर्जुले यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन अमृता तनपुरे यांनी तर दिव्या बैनाडे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल तुपे, अमोल पवार, सिताराम बेनाड यांच्यासह आदी उपस्थित होते.

बारवाले विद्यालय मांडवा
बदनापूर | तालुक्यातील मांडवा येथील पद्मभूषण डॉ बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थी व विद्यार्थीनींनी शिक्षकांची भुमिका बजावली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या ग्रीटिंग कार्ड, व इतर भेटवस्तु शिक्षक, शिक्षिकांना देण्यात आल्या. यावेळी सहशिक्षक अंभोरे, म्हस्के, कंकाल आदींची उपस्थिती होती.

रोटरी क्लब, जालना
जालना | शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बारवाले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कविता प्राशर, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज, मुख्याध्यापक आर. आर. जोशी, शिक्षक जगत घुगे , संतोष जोशी व डॉ. नंदकिशोर डंबाळे यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात रोटरीचे किशोर देशपांडे यांनी आयुष्यात शिक्षकाचे अनन्यसाधारण महत्व विशद करून रोटरीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील कार्य, उपक्रम तसेच शिक्षकांचा करण्यात येणाऱ्या सन्मानाविषयी माहिती दिली. सूत्रसंचलन सुरेश मगरे यांनी तर प्रशांत महाजन यांनी आभार मानले.

जि.प.प्रशाला वाघ्रुळ
वाघ्रुळ | जालना तालुक्यातील वाघ्रुळ येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गुरुजनांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. केंद्रप्रमुख विजय चित्ते यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी सौरभ खांडेभराड, ओम अंभोरे, सतीश रोकडे, महेश राऊत, व्यंकटेश वैद्य, आदित्य खरात, साक्षी तिडके, श्रद्धा खरात, कामक्षा खांडेभराड, गौरी खरात, गायत्री खांडेभराड, श्रुती तिडके, रोहिणी खरात यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली.

मत्स्योदरी ज्ञान मंदिर
अंबड | येथील मत्स्योदरी ज्ञान मंदिर प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक लक्ष्मण कोळकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी एस. एम. भाकरे, यु. टी. विटोरे, ए. आर. लोंढे, आर. व्ही. बारवकर, डी. के. खरे, पी. डी. कदम, एस. बी. मोरे, बोरुडे, ढेंबरे, बी. एम. वाघमोडे, टी. ई. मोताळे, बचाटे, एस. आर. गाडेकर आदी उपस्थित होते

ठाकरे विद्यालय
शहागड | येथील प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक महेश गोडबोले, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...