आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील आदर्श कॉलनीत गुटखा माफिया परमेश्वर बिल्लोरे याच्या घरावर ३ फेब्रुवारी रोजी गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप व त्यांच्या पथकाने छापा टाकून २ लाख ५ हजार ९७० रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. दरम्यान, तीर्थपुरीला परिसरातील कुंभार पिंपळगाव, अंबड व तलवाडा येथून गुटख्याचा मोठा पुरवठा होतो.
पोलिसांनी यामध्ये ८१ हजार २५० रुपयांचा राजनिवास गुटखा ३२५ पुडे, ५० हजार ८०० रुपयांचा गोवा १००० लाल गुटखा १२७ पुडे, ३ हजारांचा विमल पान मसाला १० पुडे, ४९ हजार ५०० रुपयांचा हिरा पान मसाला १६५ पुडे, १६ हजार २५० रुपयांचा जाफराणी राजनिवास जर्दा ३२५ पुडे, ४९५० रुपयांचे रॉयल तंबाखूचे १६५ पुडे, २२० रुपयांची विमल तंबाखू जर्दा १० पुडे असा एकूण २ लाख ५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सपोनि सुभाष सानप, सपोनि दीपक लंके, पोहेकॉ श्रीधर खेडकर, पोहेकाॅ नारायण माळी, पोलिस अंमलदार महेश तोटे, अशोक कावळे, गणेश मुंढे, भागवान शिंदे, महिला अंमलदार मीरा मुसळे यांनी करून परमेश्वर बिल्लोरे यास ताब्यात घेतले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.