आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजातील व्यक्तीला प्राधान्य:भोकरदन येथे हज यात्रा पूर्ण करून आलेल्यांचा सत्कार

भोकरदन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हज यात्रा पूर्ण करून आलेल्या भोकरदन शहरातील सर्व हाजींचा व मौलानांचा माजी आमदार चंद्रकांत दानवे व युवानेते सुधाकर दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चंद्रकांत दानवे म्हणाले की, भोकरदन शहरामध्ये बहुसंख्य मुस्लिम समाज आहे. आपल्या समाजाने आता खऱ्या अर्थाने एकत्र येऊन समाजाला तसेच समाजातील व्यक्तीला प्राधान्य देऊन सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मी आमदार असताना नेहमीच प्राधान्य दिले आहे.

मग ते भोकरदन, जाफराबाद शहरामध्ये असो किंवा मतदारसंघातील कोणत्याही गावात असो ईदगाह, कब्रस्तान वॉलकंपाऊंड, शादीखाने, दानापूरच्या मदरशासाठी लाईट, मौलाना आझाद मंडळाअंतर्गत मुस्लिम बांधवांना फाईल तसेच अल्पसंख्यांक बांधवांच्या सुविधांसाठी निधी आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आता सुध्दा देखील तूम्ही राहता त्या वाॅर्डांमधील नाले, रस्ते, पाणी, कचरा, अशा अनेक समस्या आहेत. ह्या समस्या सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपण एक हात समाजासाठी हा विचार बाळगून आपल्या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी हाफिज रियाज, हाफिज कारी इम्रान, हाफिज मौलाना हासन, सुधाकर दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. हाजी नसिब खाँ, हाजी मौलाना हारून, हाफिज शफिक, छोटू शेठ, हाजी अजीस पार्टी, शब्बीर कुरेशी, डॉ. शेख, प्रा. नईम कादरी, नसीम पठाण, कदीर बापू, अजहर शहा, अब्दुल रऊफ भाई, शमीम भाई मिर्झा, हामदु चाऊस, हाजी मुजीब, डॉ. सलीम, सय्यद कुदरत अली, हाजी सय्यद आजीम, हाजी मजर शेठ, हाजी शेख नईम, हाजी शेख रऊफ, हाजी शेख शफिक, सय्यद अश्पाक, हाजी ताज़ साहेब, सायब मामू, एजाज शेठ, शेख रहेमानभाई, इरुफान पटेल, इरुफान शहा, साबेर शहा, शहा, मुमताज मदनी, इसरार पठाण, सय्यद आरेफ, फईम कादरी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...