आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा‎:हर घर नल, हर घर जल योजनेत‎ ग्रामीण भागातही शुध्द  पाणीपुरवठा‎

जाफराबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या‎ अतिशय महत्त्वकांशी अशा हर‎ घर नल हर घर जल या‎ जलजीवन मिशन अंतर्गत‎ राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या‎ माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा‎ प्रश्न कायमस्वरूपी निकाली‎ निघाला असल्याचे प्रतिपादन‎ आमदार संतोष पाटील दानवे यांनी‎ गोंधनखेडा आणि गणेशपुर येथे‎ विविध विकास कामांचा उद्घाटन‎ व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.‎

यावेळी शालीकराम म्हस्के,‎ गोविंदराव पंडीत, संतोष लोखंडे,‎ राजेश चव्हाण, दत्तू पंडीत,‎ दगडुबा गोरे, साहेबराव कानडजे,‎ मधुकर गाढे, सरपंच विजय‎ परीहार, सरपंच विठ्ठल गोरे,‎ उपसरपंच रामदास जाधव, दिपक‎ बोराडे, सर्जेराव शिंदे, विष्णु गोरे,‎ जगन पंडीत, अरुण अवकाळे,‎ दिपक बोराडे, दिपक गोरे, लक्ष्मण‎ शिंदे, राजु खोत, संदिप गोरे,‎ माधवराव अंधारे, फैसल चाऊस‎ यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे‎ बोलतांना आ. दानवे म्हणाले की,‎ देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र‎ मोदी, महाराष्ट्र राज्याचे‎ कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथराव‎ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी‎ फडणवीस आणि केंद्रीय‎ राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी‎ नदी जोड प्रकल्पाच्या‎ संकल्पनेबाबत‎ मराठवाड्यासारख्या दुष्काळी‎ भागात नदी जोड प्रकल्पाची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यशस्वी अंमलबजावणी‎ करण्यासाठी ५५ हजार करोड‎ रुपये खर्च करण्यात येणार आहे.‎

हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर‎ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या‎ शेतीला मुबलक प्रमाणात पाणी‎ तर मिळेलच परंतु मराठवाड्याला‎ दुष्काळी भाग हा लागलेला‎ कलंक सुद्धा पुसणार असल्याचे ते‎ म्हणाले. यावेळी भागवत गोरे,‎ संतोष पाचे, समाधान बोराडे,‎ दिलीप गोरे, गजानन बोराडे,‎ अभिषेक गोरे, गजानन अंधारे,‎ अनिल वरगणे, किशोर कांबळे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मोतीराम अंधारे, गणेश लहाने,‎ रमेश राठोड, शिवाजी बनकर,‎ चंद्रकांत बनकर, राम गुरव, दत्ता‎ सोनसाळे, बाबासाहेब पुंगळे,‎ अमोल गोरे, परशुराम रजाळे,‎ शिवाजी बोराडे, नितीन बोराडे,‎ योगेश बोराडे, रामदास गावंडे,‎ दत्ता पंडित, भिसे, संतोष अंधारे,‎ प्रदीप गावंडे, ज्ञानेश्वर अंधारे,‎ सोमीनाथ अंधारे, शिवाजी निकस‎ इत्यादी सह भाजपा पदाधिकारी‎ कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते.‎

गोंधनखेडा, गणेशपूर येथे कामे‎ गोंधनखेडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना ८० लक्ष‎ रुपये, दलित वस्तीमध्ये सामाजिक सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे ७‎ लक्ष रुपये तर गणेशपुर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना‎ ३०.५० लक्ष रुपये, दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ते करणे १० लक्ष रुपये,‎ स्मशानभूमी बांधकाम करणे ६ लक्ष रुपये, पानंद रस्ता करणे ५ लक्ष रुपये,‎ जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत बांधकाम करणे २ लक्ष रुपये अशा‎ विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.‎

बातम्या आणखी आहेत...