आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे सर्व भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. सलग तीन दिवस प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत गावातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकावला जावा, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खणेपुरी येथे अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजश्री एडके, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच तुकाराम शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष भगवान शिंदे, मुख्याध्यापक डॉ. रविंद्र काकडे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पवार, संदीप शिंदे, बाबासाहेब आरेकर, बाबुराव गायकवाड, जनार्दन गायकवाड, रघुनाथ दाभाडे, संतोष बोर्डे, सूर्यभान गाढे, शकील शेख, कदीर शेख, विलास पवार, परमेश्वर टापरे, अशोक सपकाळ, खारतुडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात मुख्याध्यापक डॉ.रवींद्र काकडे यांनी भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचे महत्त्व समजावून सांगितले. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत गावातील सर्व घरावर तिरंगा फडकविण्यासाठी शाळेच्या वतीने पदाधिकाऱ्यांना तिरंगा ध्वज भेट देण्यात आला.
या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण कशा पद्धतीने करावे, ध्वजाची संहिता काय आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बाबासाहेब आरेकर यांनी हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत ग्रामस्थांना आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याची नामी संधी यानिमित्त मिळाली असल्याचे सांगितले. याप्रसंगी सरपंच एडके म्हणाले, ग्रामपंचायतच्या वतीने बचत गटांना प्रत्येक नागरिकाला ध्वज मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात ध्वज उपलब्ध करून दिलेले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष चव्हाण, गणेश भुतेकर, गजानन वनगुजरे, संग्राम बसवे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.