आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी:हजरत टिपू सुलतान यांचे योगदान प्रेरणादायी

टेंभुर्णी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेर ए म्हैसूर हजरत टिपू सुलतान यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचे नांदी मदरसाचे मौलाना मिनहाज इशाअती यांनी सांगितले.

टेंभुर्णी येथील शहीद टिपू सुलतान युवा मंच तर्फे भाजीमंडीत शुक्रवारी रात्री टिपू सुलतान जयंतीचे औचित्य साधून आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मौलाना मिनहाज म्हणाले, टिपू सुलतान यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत निकराचा लढा दिला. कोणताच धर्म वाईट कृत्यांना परवानगी देत नाही. तेव्हा आपण सर्वांनी मिळून अखिल मानवजातीच्या भल्यासाठी झटले पाहिजे. महापुरुषांच्या जयंत्या डीजे लावून नाही तर गोरगरिबांना मदत करून साजऱ्या करावी. या भारताला एक वैभवशाली राष्ट्र बनविण्यासाठी सर्वजातीधर्माच्या युवकांनी झटले पाहिजे.

महापुरूषांचे केवळ नाव घेणारे बनू नका तर त्यासोबतच त्यांचे कार्यही जाणून घ्या असे आवाहन केले. यावेळी मौलाना अब्दुल रहेमान मोहम्मदी, हाफिज अलीमोद्दीन, हाफ़िज़ मुजाहिद, मौलाना असगर, हाफ़िज़ नाज़िम, मौलाना मुजाहिद, हाफ़िज़ अशफ़ाक़, मौलाना रियाज़, हाफ़िज़ इमरान, मोईन बागवान, हाफ़िज़ नासेर, हाफ़िज़ फहीम, हाफ़िज़ फ़ारूक़, मौलाना अनीस, मौलाना सलीम, हाफिज सईद, मोहम्मद सगीर, शेख़ इरफ़ान, शेख़ शाहेद आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...