आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यसेवा:हजरत टिपू सुलतान यांचा भारत देश आरोग्यसेवेत अग्रेसर होता : प्रा. जाधव

भोकरदन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हजरत टिपू सुलतान देशाचे पहिले मिसाइलमॅन आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी टिपू सुलतान सदैव अग्रेसर होते. त्यांनी विविध योजना राबवून शेतकऱ्यांबरोबर दुजाभाव किंवा अन्याय होऊच दिला नाही. विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात त्यांची पकड अधिक असल्याने त्यांच्या काळात आपला देश अग्रेसर होता, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. बालाजी जाधव यांनी केले.

भोकरदन येथील पोलिस ठाण्यासमोर रविवारी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त टिपू सुलतान सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रा. बालाजी जाधव, यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या जीवन शैलीवर मार्गदर्शन करून हजरत दिपू सुलतान यांच्या कार्याची ओळखही करून दिली.

पुढे प्रा. जाधव म्हणाले की, आज काही लोक टिपू सुलतान विषय खोटी व दिशाभूल करून त्याचा कमीपणा करण्याचे काम करत आहेत. मात्र, हजरत टिपू सुलतान यांचा इतिहास हा कधीच पुसला जाऊ शकत नाही. जनतेसाठी ते शेवटपर्यंत लढले. मात्र, आपल्याच काही गद्दारांनी दगा केली होती. इंग्रजांना धडा शिकविणारे महान व्यक्तिमत्व हजरत टिपू सुलतान आहे. त्या काळात देश आरोग्यासाठी इतर देशापेक्षा ही अग्रेसर होता वैद्यकीय क्षेत्रात देशाचा हात कोणीच धरू शकत नव्हता. तो काळ टिपु सुलतान यांचा होता. जनतेवर कधीच अन्याय व अत्याचार होऊ दिलाच नाही.

जातीपातीचे राजकारण देखील त्यानी कधीच केले नाही. आज याची जाणीव व जनजागृती होते गरजेचे आहे असेही जाधव यांनी या वेळेस बोलतांना सांगितले. या वेळी हाफिज असरारूलहक यांनी सुद्धा आपल्या वेगळ्या शैलीत कवितांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर स्वतंत्रसेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या कार्याची माहिती दिली. या वेळेस टिपू सुलतान सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेबुब भारती, अब्दुल कदीर बापू, जुनेद पठाण, नईम काद्री, मराठा सेवा संघाचे बबन जंजाळ, गुड्डू भैय्या, आरोग्य मित्र वाहिद खान, जयंत जोशी, श्रावण कुमार अकसे, प्रदीप जोगदंडे, महेजाद खान, नसीम पठाण, विलास शिंदे अक्रम कुरैशी, शमीम मिर्झा, रिजवान भाई, अमान खान, शारुख सर, जुनेद काद्री, गुड्डू काद्री आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नईम काद्री यांनी तर आभार साबेरसर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...