आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेसमोर आत्‍महत्‍या:रेल्वेसमोर येऊन उभा राहिला; इंजिनला धडकून व्यक्तीचा मृत्यू

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव मराठवाडा रेल्वेसमोर येऊन एक जण उभा राहिला. रेल्वेच्या इंजिनला धडकून त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दरेगावजवळ बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती. सचिन खरात (नागेवाडी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात चंदनझिरा पोलिस ठाण्यात रेल्वेचे डेप्युटी स्टेशन मास्तर अशोक तपासे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी चंदनझिरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल वाघ हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...